You are currently viewing ज्येष्ठ गझलकार प्रा.सुनंदा पाटील – गझलनंदा यांची नात स्पृहा पाटीलच्या आवाजात टाइम्स म्युजिक कडून हनुमानचालिसाचे रेकॉर्डिंग

ज्येष्ठ गझलकार प्रा.सुनंदा पाटील – गझलनंदा यांची नात स्पृहा पाटीलच्या आवाजात टाइम्स म्युजिक कडून हनुमानचालिसाचे रेकॉर्डिंग

 

ज्येष्ठ गझलकार प्रा. सुनंदा पाटील – गझलनंदा यांची नात *स्पृहा सागर पाटील*, वय ११ वर्षे हिच्या आवाजात श्री हनुमान चालीसाचे रेकॉर्डिंग झाले आहे . प्रस्तुत रेकॉर्डिंग टाईम्स म्युझिक VDO यांनी केले असून केवळ ५ दिवसात ३० हजाराच्यावर तिला views आलेले आहेत.

अतिशय गोड आवाज / ताल – सुराची समज – स्पष्ट उच्चार यामुळे हे गायन अतिशय उत्तम आणि श्रवणीय झालेले आहे. स्पृहा सध्या सहाव्या वर्गात शिकते आहे . स्पृहा शास्त्रीय संगीत सुप्रसिद्ध गायिका सौ. सुहासिनी नांदगावकर (कवीवर्य शांताराम नांदगावकर यांच्या सुनबाई) यांच्याकडे शिकते आहे. शास्त्रीय कंठसंगीताच्या दोन परीक्षा ती उत्तीर्ण झालेली आहे.

स्पृहाला अनेक गायन स्पर्धांमधे सुयश प्राप्त झालेले आहे तसेच Rhythem of life – स्वरांजली – गझलांकित यासह अनेक मंचांवरून ती गात असते . TV पुढारी – छोटा वारकरी तसेच TV ABP माझाला मराठी दिनानिमित्र ती गायली आहे . यूट्यूब वर तिची अनेक गाणी उपलब्ध आहेत. गायनाशिवाय दिला चित्रकलेचीही आवड आहे .

इतक्या लहान वयात तिला मिळालेल्या या सुसंधीबद्दल आणि यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे .

प्रतिक्रिया व्यक्त करा