You are currently viewing चला जाऊ पंढरीला

चला जाऊ पंढरीला

*ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*चला जाऊ पंढरीला*

 

आषाढाच्या सरी

झिमझिमल्या आता अंगणी

विठूची आळवणी

मनात….

 

चला जाऊ

पंढरीच्या वाटेवरी आता

अभंग गाता

विठूरायाचे….

 

प्रपंचाची चिंता

नकोआता मनात

भक्तीरंग ह्रदयात

माऊलीचा….

 

दिंड्या पताका

शिस्तीत चालती वारकरी

भजन रामकृष्णहरी

मुखाने….

 

डोईवर तुळस

पाय चालती नादात

पंढरीची वाट

दृष्टीपुढे….

 

दुथडी भरून

चंद्रभागा ही वाहते

पद प्रक्षाळिते

भक्तांचेच…‌

 

भगवी पताका

दिसे डोळ्यांपुढे कळस

दर्शनाची आस

पूर्णत्वाला…‌!!

 

अरुणा दुद्दलवार@✍️

प्रतिक्रिया व्यक्त करा