You are currently viewing सावंतवाडीत रस्ता ओलांडणाऱ्या महिलेला दुचाकीची धडक; अपघातात महिला जखमी

सावंतवाडीत रस्ता ओलांडणाऱ्या महिलेला दुचाकीची धडक; अपघातात महिला जखमी

सावंतवाडीत रस्ता ओलांडणाऱ्या महिलेला दुचाकीची धडक; अपघातात महिला जखमी

ग्रामस्थ, नातेवाईक व पोलिसांच्या मदतीने जखमी महिलेला उपजिल्हा रुग्णालयात दाखल; प्रकृती स्थिर

सावंतवाडी :

सावंतवाडी तालुक्यातील धवड येथील सौ. रजनी राजेश सरवनकर (वय ४६) या महिला रस्ता ओलांडत असताना दुचाकीची धडक बसून अपघात झाला. शुक्रवारी सायंकाळी पावणे सातच्या सुमारास ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, सौ. सरवनकर या कपडे धुऊन आपल्या कामानिमित्त रस्ता ओलांडत असताना प्रकाश पांडुरंग आबिटकर (वय ३६) यांच्या ताब्यातील दुचाकीची त्यांना धडक बसली. या दुचाकीवर मागे गणेश पांडुरंग देसाई (वय ३९, रा. चंदगड, जि. कोल्हापूर) हेही प्रवास करत होते.

प्रकाश आबिटकर हे पूर्वी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात कक्षसेवक म्हणून कार्यरत होते. दोन वर्षांपूर्वी त्यांची मूळ गावी बदली झाली होती. कामानिमित्त ते शुक्रवारी दुपारी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात आले होते. काम आटोपून चंदगड येथे परत जात असताना हा अपघात घडला.

अपघातानंतर ग्रामस्थ, नातेवाईक आणि पोलिसांच्या मदतीने जखमी महिलेला रुग्णवाहिकेतून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टर मानसी बनसोडे, डॉ. वैभव, डॉ. अनिकेत गुरव, डॉ. तेजस्विनी आडारकर, डॉ. दुर्गा सावंत, डॉ. वैभव उगले तसेच परिचारिका शेळके यांनी तातडीने प्राथमिक उपचार केले. आवश्यक औषधे व इंजेक्शन देऊन सीटी स्कॅनही करण्यात आले.

सध्या जखमी महिलेची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र (राजू) मसुरकर यांनी दिली. या मदतकार्यात त्यांनीही सहकार्य केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा