*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*कशी फोडणार आता हंडी*
(911)
जर शब्दांना पंख फुटले तर
वाङ्मय लिहीले जाईल उत्तम
सोम्या गोम्या होतो डाॅक्टर
बसेल त्याला मजबूत लगाम
//1//
साहित्य येऊन अनुवादित
भाषा भाषात होईल संवाद
द्वेषावरती पडेल पडदा
मिटून जातील भाषिक वाद
//2//
संवादाला मिळेल जागा
नाही रहाणार गैरसमज
हवी कशाला मंजुरी सरकारची
लोप पावेल *भाषा माज*
//3//
दरी द्वेषाची होईल कमी
भाषा भाषात होईल संवाद
सलोखा होईल *दोघांत*
मतांतराचा शमेल *वाद*
//4//
कुठले पंख कसले काय
शब्दफुलांची खायची साय
करून बदल समजुतीत
आपसात कुणी भांडायच नाय
//5//
नाहीत जाणार सोडून देश
नका काळजी करू कुणी
पंढरीत बसलेली रुख्मिणी
समजून घालीत पाजून पाणी
//6//
जरतरची कशास *भाषा*
छाटलेत पंख *ऑलरेडी*
कोंबून ठेवले गुगलने डोक्यात
कशी फोडणार आता हंडी
//7//
विनायक जोशी🖋️ ठाणे
1911/9324324157
