*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री शीला पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*
*दसरा सण मोठा* 🌹
आली विजया दशमी
सण करू या साजरा
उत्साहाचा हाचि सण
म्हणती तयास दसरा
साडेतीन मुहुर्ताचा
दसरा सण आहे मोठा
हिंदु धार्मियांना आज
नाही आनंदाला तोटा
काढु दारात रांगोळी
बांधु मंगल तोरण
जयजयकार श्रीरामाचा
करू तयासी औक्षण
आपट्याच्या पानातुन
नातीगोतीला उजाळा
घटाचे करू पुजन
हाचि मंगल सोहळा
दृष्टांचा करी संहार
वध केला असुराचा
विजया दशमी दिनी
वर्णु महिमा यशाचा
सायंकाळी सीमोल्लंघन
संगे आपट्याचे पान
देवु घेवु एकमेका
त्यास समजुन सोनं
धागा स्नेहाचा हृदयी
करू नाते ऋधिंगत
ऋणानुबंधाच्या गाठी
वाटु सोनं आपसात
*शीला पाटील. चांदवड.*
