You are currently viewing काव्यपूर्ती

काव्यपूर्ती

*ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित आशयावरून अप्रतिम काव्यरचना*

 

*काव्यपूर्ती*

*ओळी….कवी फ.मु.शिंदे यांच्या कवितेतील*

*माहेरच्या वाटेवरील *बाभूळसुध्दा‌आपली वाटते*

*भलेही असतील काटे पण ती* *माझ्या माहेरी रहाते*

*अरुणा दुद्दलवार*

 

माझं माहेर माहेर

शब्द येता गहिवर

आठवे‌ सईबाई

मोठा वड पिंपळपार …..!!

 

वाजे घुंगूर घुंगूर

येते माहेराची गाडी

दिसे मला दुमजली

मोठ्या वाड्याची गं माडी…!!

 

सजे अंगण अंगण

सडा पडे‌प्राजक्ताचा

गंध दरवळ दाटे

जाई जुई मोग-याचा….!!

 

झुले झोपाळा झोपाळा

आठवांचा बाई मनी

आईबाप बंधुराजा

वहिनीबाई हिरकणी…..!!

 

असा उमाळा उमाळा

जरी काटे अंगावरी

उभी फुलून बाभुळ

माहेरच्या वाटेवरी….!!

 

काटा टोचता टोचता

सय येते माहेराची

नको आणू डोळा पाणी

सर येईल सुखाची….!!

 

°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°

*अरुणा दुद्दलवार*@✍️🌹

प्रतिक्रिया व्यक्त करा