*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी संजय धनगव्हाळ लिखित अप्रतिम काव्यरचना*
*भाज्यांच्या गप्पा*
एक दिवस भाजी मंडईत
गप्पांची रंगत रंगली
कोण श्रेष्ठ कोण कनिष्ठ
आपसात सभा भरली
टोमॅटो म्हणे मी
लालभडक रूबाबदार
ताटात असते माझीच झलक
म्हणतात मला चवदार
वांग म्हणतो थांब रे जरा भाऊ
उगाच नको भाव खाऊ
चविष्ट माझं भरीत करतात
ढेकर देऊन बोटं चाखतात
बटाटा म्हणतो अरे…
माझ्याशिवाय पान हलत नाही
भरल्या ताटात मी असल्याशिवाय
पोट कुणाचं भरतं नाही
कांदा म्हणे मी दिसतो लहान
सगळ्यांमध्ये महान
बघतात मला डोळे पुसून
भाजी शिजते हसून हसून
मिरची जरा ठेचून म्हणाली
मी असली तिखट तरी
प्रत्येकाला हवीच असते
माझ्याशिवाय भाजी चविष्ट नसते
गाजर म्हणे मी प्यारा प्यारा
रंगीन माझा रंगच न्यारा
कोशिंबीर बरोबर हलव्यात जातो
तेव्हढाच जिभेला सहारा होतो
गिलके दोडके कारले म्हणे
पालक पोकळा पोषक फार
आरोग्याचा खजिना म्हणजे
शेवग्याच्या शेंगा थंडगार
बारकीबुरकी गवार भेंडी
मधेच लुडबुड करते
झुपकेदार कोथिंबीरी
तेलावर तरंगते
चवळीची शेंग लांबसडक
वटाना मारतो धडक
फुलकोबी पत्ताकोबी गोड जोडी
पुलाव्यात येते खमंग गोडी
अचानक भोपळा पुढे येतो
सगळ्यांकडे पाहून हसमत म्हणतो
कशाला करता एवढा अभिमान
प्रत्येकाचं असतं वेगळं स्थान
सगळ्या भाज्या झाल्या शांत.
समजला त्यांना एकच मंत्र
रंगरूप असो नसो सर्वांनी एकत्र रहायचं
प्रत्येकाच्या पिशवीत आनंदाने जायचं
*संजय धनगव्हाळ*
*(अर्थात कुसुमाई)*
९४२२८९२६१८
९५७९११३५४७
