दत्तोपंत म्हसकर आणि नवयुग यांच्या वतीने वनवासी महिलांना साडी वाटप
पिंपरी
पिंपरी – चिंचवड शहरातील स्व. दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्वस्त संस्था तसेच नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने अंदर मावळ आणि जुन्नर तालुक्यातील वनवासी महिलांना दिवाळी भेट म्हणून साडी वाटप करण्यात आले. स्व. दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष प्रदीप पवार, सचिव मिलिंद कुलकर्णी, संदीप पंडित, सुनील पंडित, मकरंद कुलकर्णी, अशोक बारस्कर, सुनील आगळे आणि नवयुगचे साहित्यिक कार्यकर्ते यांनी सिरदेवाडी, उंबरवाडी, आपटाळे येथील वनवासी पाड्यांवर जाऊन सरपंच दिलीप बागड तसेच रामभाऊ शेडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत सुमारे चारशे पन्नास वनवासी महिलांना दिवाळी भेट म्हणून साड्यांचे वाटप करून त्यांच्याप्रति स्नेहादर व्यक्त केला. शिक्षण, संस्कार आणि आरोग्य हे समाजाच्या प्रगतीचे तीन महत्त्वाचे आयाम मानून स्व. दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्वस्त संस्था सुमारे पंधरा वर्षांपासून विविध उपक्रमांच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासत आहे. दिवाळीसारख्या भारतीय संस्कृतीतील सर्वोच्च सणानिमित्त वनवासी पाड्यांवरील महिलांच्या चेहऱ्यावरील आनंद फुलविण्याचे समाधान यानिमित्त वनवासी कल्याण आश्रम आणि दोन्ही संस्थांच्या कार्यकर्त्यांनी अनुभवले.
– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२
