डेक्कन कॉन्करर्स – राऊंड २ मध्ये सारंगी करंजावणे हिची दिमाखदार कामगिरी; लेडीज क्लासमध्ये विजेतेपदावर मोहोर.
पुणे
पुणे येथे दिनांक १५ नोव्हेंबर २०२६ रोजी रोड राईझ क्लब यांच्या वतीने AISSMS ग्राउंड येथे ‘डेक्कन कॉन्करर्स – राऊंड २’ या भव्य डर्ट ट्रॅक रेसिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेमध्ये पुण्याची युवा महिला रायडर सारंगी करंजावणे हिने आपल्या उत्कृष्ट रायडिंग कौशल्याच्या, जिद्दीच्या आणि आत्मविश्वासाच्या जोरावर लेडीज क्लासमध्ये प्रथम क्रमांक पटकावत विजेतेपद संपादन केले.अत्यंत चुरशीच्या आणि आव्हानात्मक स्पर्धेत सारंगीने आपल्या कौशल्यपूर्ण कामगिरीने उपस्थितांची मने जिंकली. वेग, नियंत्रण, अचूकता आणि जिद्द यांचा उत्तम समन्वय साधत तिने हे यश मिळवले.
मोटरस्पोर्ट्ससारख्या साहसी क्षेत्रात महिला रायडर्सही पुरुषांच्या बरोबरीने आपली क्षमता सिद्ध करू शकतात, याचे सारंगीने पुन्हा एकदा उदाहरण घालून दिले आहे.
या विजयामुळे सारंगीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून तिच्या रेसिंग कारकिर्दीतील हा आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला आहे. सारंगी करंजावणे हिचे वडील पण एक उत्कृष्ट रायडर असून तिला मार्गदर्शन तिच्या घरातून मिळाले आहे आई एका खाजगी कंपनीत व्यवस्थापक पदावर काम करत असून त्या मानवी हक्क संरक्षण जागृतीच्या पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष आहेत.
सारंगी करंजावणे हिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल तिचे सर्व स्तरांतून होत आहे.
