You are currently viewing बोर्डवेच्या शोभा बागवे यांची कणकवली महिला उपतालुकाप्रमुखपदी निवड

बोर्डवेच्या शोभा बागवे यांची कणकवली महिला उपतालुकाप्रमुखपदी निवड

बोर्डवेच्या शोभा बागवे यांची कणकवली महिला उपतालुकाप्रमुखपदी निवड

महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव यांच्याकडून घोषणा; शोभा बागवे यांच्या निवडीने कळसुली विभागातील शिवसैनिकांमध्ये उत्साह

कणकवली :

बोर्डवे गावच्या धडाडीच्या महिला कार्यकर्त्या श्रीमती शोभा बागवे यांची शिवसेनेच्या कणकवली महिला उपतालुकाप्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. महिला जिल्हाप्रमुख सौ. नीलम पालव यांनी त्यांच्या निवडीची घोषणा केली. या निवडीमुळे कळसुली विभागातील शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

काही दिवसांपूर्वीच शोभा बागवे यांनी शिंदे गटाला धक्का देत शिवसेनेत प्रवेश केला होता. स्थानिक कार्यकर्त्यांच्या कामकाजाला कंटाळून त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. पक्षप्रवेशानंतर त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.

या निवडीमुळे शोभा बागवे यांचा तसेच कळसुली विभागाचा पक्षाकडून सन्मान झाल्याची भावना शिवसैनिकांनी व्यक्त केली.

यावेळी जिल्हाप्रमुख वैभव नाईक, कणकवलीचे उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, तालुकाप्रमुख राजू राठोड, प्रथमेश सावंत, कळसुली विभागप्रमुख चंद्रहास उर्फ बबली राणे यांच्यासह तालुक्यातील आणि विभागातील बहुसंख्य कट्टर शिवसैनिक उपस्थित होते. उपस्थित पदाधिकारी व शिवसैनिकांनी शोभा बागवे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा