*जागतिक साकव्य विकास मंच तथा साहित्यरत्न लेखणीसम्राट विचारमंच महाराष्ट्रचे प्रशासक लेखक कवी प्रभाकर भामरे लिखित अप्रतिम काव्यरचना*
*बालदिवस*
चाचा नेहरूंचे बालक हृदय
बाल्य उद्याचा सर्वोदय ||ध्रु||
कोमल फुलांचा गंध
निर्मळ झऱ्याचा छंद
पहाटेचा सोनेरी रंग
हृदयाचा निष्पाप संग ||१||
हास्य चांदण्यांची रास
स्वप्न आकाशाचा आभास
जिज्ञासा ज्ञानाची प्यास
कोवळेपण मातीचा सुवास ||२||
बालक मातीतील अंकुर
संस्कारांचा कस्तूर
भविष्याचा मधुर सूर
देशाचा तेजस्वी नूर ||३||
शाळा ज्ञानाची गंगा
खेळ जीवनाचा रंग
पुस्तक प्रकाशाची पताका
संस्कार मायेची मऊ छाया ||४||
बालपण सोन्याचा क्षण
कोमलपण मोत्यांचा कण
निरागसता हिऱ्याचे धन
हास्यमय उद्याचे पर्व महान ||५||
श्री प्रभाकर इंदुमाय गजमल भामरे. ९४२०३७३२६१
कवी / लेखक
