You are currently viewing रंगलेली मेंदी
Oplus_16908288

रंगलेली मेंदी

*ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*रंगलेली मेंदी*

 

रंगलेली मेंदी

नववधूच्या हातावर खुलते

स्वप्न सजवते

हिरवेगार….!!

 

रंग पाचूचा

युवतीच्या कोमल हातांवर

तांबडालाल रंगबहर

शोभिवंत….!!

 

मेंदी रचताना

भावसमाधी तिची लागते

स्वप्नात विसावते

मन….!!

 

माहेरचे अनुबंध

आता सोडावे लागणार

सावरणारा राजकुमार

उमदा….!!

 

हिरवा रेशीमचुडा

मेंदीने सजलेले हात

घालेल गळ्यात

लाजत….!!

 

स्पर्शाची किमया

घडेल अशी क्षणात

स्वप्नगंधा मनात

हरखते….!!

 

कर्तव्य जबाबदारी

संसार करायचा नेटका

सौख्याच्या घटिका

सहचरासह….!!

 

मेंदीचा रंग

सांगतो गोड कानात

सखयाच्या भविष्यात

सामावणे…‌!

~~~~~~~~~~~~~~~

*अरुणा दुद्दलवार@✍️*

प्रतिक्रिया व्यक्त करा