मालवणमध्ये तरुणांसाठी एक महिन्याचा ऑनलाइन जर्मन भाषा प्रशिक्षण कोर्स
लोकमान्य सोसायटी व मालवण महाविद्यालयाचा संयुक्त उपक्रम; १८ ते ३० वयोगटातील विद्यार्थ्यांना संधी
मालवण
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुणांना परदेशातील रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी आणि स. का. पाटील कला, वाणिज्य व देशभक्त शंकरराव गवाणकर विज्ञान महाविद्यालय, मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने एक महिन्याचा ऑनलाइन जर्मन भाषा फाउंडेशन कोर्स आयोजित करण्यात आला आहे.
या प्रशिक्षणात जर्मन भाषेची लिपी, व्याकरण, संस्कृती, शिष्टाचार, संवाद कौशल्य आणि दैनंदिन संभाषणाचे मार्गदर्शन केले जाणार आहे. जर्मन भाषेचे पूर्वज्ञान आवश्यक नसून, कोर्ससाठी एक हजार रुपये शुल्क आहे. गार्गी राऊत या प्रशिक्षक म्हणून मार्गदर्शन करणार आहेत.
