*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*तिचा ..आकाशकंदील !*
तिचा आकाशकंदील
वर्षभर दारातच उभा राहतो
झिलमिल झिरझिरित कपड्यांत
मुलं,नातवंड पतवंडाची वाट पाहतो
पुढच्या दिवाळीची वाट बघत तिही आता आसवं ढाळत नाही
निरोप देतांना ह्दय विदीर्ण होत
पण चेहर्यावर ती आणत नाही
घर आवरतांना ती
सा-यांचे स्पर्श आठवते
नातवांच्या स्पर्शात
थोरल्या पोराला आठवते
पांघरूण आवरतांना ती स्पर्शांना
कुशीत गुंडाळून घेते
न धुवायला टाकता तशीच
कपाटात ठेवून देते
यांनी लावलेलं रेशमी पदरावरचं
चंदनाच अत्तर ती आठवते
आकाशकंदीलान बाहेरून पाहिलं तर!
थरथरत्या हाताने ती लाजून घेते
लाडू नातवाने गट्ट करतांना
लेकराने पुसलेले डोळे आठवते
पलंगाखाली लपलेल्या पतवंडात
ती आपल्या पोरांना शोधत राहते
ओकाबोक्या झालेल्या किल्ल्याचे
मावळे तिला साद घालतात
महाराजांचे अभय तिच्या घराला
पुढल्या दिवाळीची सारे वाट पाहतात
आकाश कंदिल..तोचं ..तोचं..
पुन्हा दिवाळीला..वाट पाहिल….
बाबा ठाकूर
