मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलच्या मुलांच्या थ्रोबॉल संघाचे जिल्हास्तरावर उपविजेतेपद; मुलींच्या संघाला तृतीय क्रमांक!
सावंतवाडी
सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल, सावंतवाडी या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय थ्रोबॉल स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केले.
या स्पर्धेत विद्यालयाच्या सतरा वर्षे खालील वयोगटातील मुलांच्या संघाने उत्कृष्ट सांघिक खेळाचे प्रदर्शन करीत द्वितीय क्रमांक पटकावून उपविजेतेपद प्राप्त केले.त्याचप्रमाणे मुलींच्या सतरा वर्षे खालील वयोगटातील संघानेही जिद्द, चिकाटी आणि उत्तम खेळकौशल्याच्या जोरावर तृतीय क्रमांक मिळवला.
दोन्ही संघांनी दाखवलेली सांघिक भावना, खेळातील शिस्त, आत्मविश्वास आणि मेहनत कौतुकास्पद ठरली. या यशामुळे विद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
या उत्तुंग यशाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीमंत राजेसाहेब खेमसावंत भोंसले ,चेअरमन श्रीमंत राणीसाहेब शुभदादेवी खेमसावंत भोंसले,कार्यकारी विश्वस्त श्रीमंत लखमराजे भोंसले , विश्वस्त युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले व मंडळाचे संचालक श्री दिलीप देसाई , मंडळाचे सहाय्यक संचालक ॲड. शामराव सावंत, मंडळाचे सदस्य श्री जयप्रकाश सावंत ,डॉ.सतीश सावंत ,मुख्याध्यापिका श्रीमती अनुजा साळगांवकर तसेच क्रीडा शिक्षक श्री भूषण परब, प्रशालेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी ,पालक शिक्षक संघ कार्यकारी समितीचे सदस्य यांनी दोन्ही संघांचे अभिनंदन केले व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
