पत्रकार दिनानिमित्त प्रशासनाकडून शुभेच्छा –  शुभांगी साठे

पत्रकार दिनानिमित्त प्रशासनाकडून शुभेच्छा – शुभांगी साठे

ओरोस :

सिंधुदुर्गनगरी-विकासाच्या प्रवाहात योग्य दिशा देण्याचे काम पत्रकार करत असतात. आज पत्रकार दिनाचे औचित्य साधून निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी मुख्यालयातील पत्रकारांशी भेट घेवून शुभेच्छा दिल्या. यावेळी त्या म्हणाल्या बाळशास्त्री जांभेकर यांचा हा सिंधुदुर्ग जिल्हा आहे. या जिल्ह्यातील आपण वारसदार पत्रकार काम करत आहात जिल्ह्याच्या विकासाच्या जडणघडणीत जिल्हा प्रशासनाला असंच सहकार्य करा, असे सांगत जिल्हा मुख्यालय पत्रकार समितीला शुभेच्छा दिल्या. यावेळी पत्रकार यांच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांना बाळशास्त्री जांभेकर यांची पुस्तिका भेट म्हणून देण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा