You are currently viewing लेखणीने दिले मला.‌…
Oplus_16908288

लेखणीने दिले मला.‌…

*ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

*लेखणीने दिले मला.‌……*
जे न देखे रवी

शब्द सामर्थ्य अफाट
जे न देखे कधी रवी
उतरवतो लेखणीतून
शब्द विश्वाचा तो कवी….

चंद्र सूर्य तारांगण
असते त्याच्या मुठीत
सरिता अन् वा-याचे
गीत रचतो तो लयीत…

माती आभाळाचे नाते
सांगे पाऊस धारेत
घन शुभ्र कधी काळे
बरसती लेखनमाळेत..‌

अंधार व उजेडाची
सम साधतो झोकात
सांज आनंदते दारी
लावताच सांजवात…

सुखदु:खाचे प्रसंग
विणतो शब्दधाग्यात
सकारात्मक पेरे बीज
येतं डोलत काव्यात..

कल्पना कवीचे जीवन
शब्द त्यांचे पंचप्राण
हरवून जातो स्वतः ला
साहित्य जगतो महान …!!

०००००००००००००००००
अरुणा दुद्दलवार @✍️

प्रतिक्रिया व्यक्त करा