*ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रज्ञा घोडके लिखित अप्रतिम काव्यरचना*
*तूच दीपावली…!*
झगमग आरास बघता,
फिटले पारणे डोळ्यांचे..
तन्मय रांगोळी दारात,
ते तोरण तुझ्या दाराचे!…
रोषणाई आग…मागं,
किती घाई नवलाईत!..
आकाशकंदिलात दीप,
झळाळला की प्रभेत!…
पंच-पक्वांनांची घाई,
गोड-मिठाई गोडीत..
झालं बोलणं मधाचं,
मुख उजळून सणात…!
किती लावू लक्ष दीप,
सख्या तुझ्या अंगणात?..
होय! तूच दीपावली,
आज भरून मनात!…
प्रज्ञा घोडके,चिंचवड,पुणे.©®
