पांढऱ्या काठीच्या सन्मानातून दिव्यांगांच्या आयुष्यात आनंदाची दिवाळी!
सिंधुदुर्ग साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था कसाल, महात्मा गांधी सेवा संघ संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र सिंधुदुर्ग व लायन्स क्लब कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य दिव्य जिल्हास्तरीय मेळावा उत्साहात संपन्न.
*कुडाळ :*
जागतिक पांढरी काठी दिनाचे औचित्य साधून तसेच दिवाळी सणाचा आनंद द्विगुणित करण्याच्या उद्देशाने सिंधुदुर्ग साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था कसाल, महात्मा गांधी सेवा संघ संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र सिंधुदुर्ग व लायन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग बांधवांसाठी पांढरी काठी दिनाचे औचित्य साधून पांढरी काठी वाटप व दिवाळीनिमित्त भेटवस्तू वाटप जिल्हास्तरीय मेळावा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम मंगळवार, दिनांक ३ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता पंचायत समिती सभागृह, कुडाळ येथे मोठ्या उत्साहात पार पडला.या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती म्हणून लायन्स क्लब कुडाळ अध्यक्ष नाईक
मॅडम,बांदेकर मॅडम
साईकृपा संस्था अध्यक्ष अनिल शिंगाडे सर, प्रकाश वाघ सर,बाबुराव गावडे सर, प्रशांत कदम सर,अश्विनी पालव मॅडम,गीता परब मॅडम, रंजना इंदुलकर मॅडम, सविता गावडे मॅडम,रमेश गावडे,सुनील कांबळे सर कर्मचारी प्रसन्ना शिर्के मॅडम,विशाखा कासले मॅडम,हर्षद खरात आदी मान्यवर लाभले. लायन्स क्लब कुडाळ अध्यक्ष नाईक मॅडम, यांनी दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन केले. व शुभेच्छा दिल्या.तसेच अनिल शिंगाडे सरांनी दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन केले. शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमात जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. जागतिक पांढरी काठी दिनाचे महत्त्व अधोरेखित करत दृष्टिबाधित बांधवांना पांढऱ्या काठीचे वाटप करण्यात आले. तसेच दिवाळी सणाचे औचित्य साधून उपस्थित दिव्यांग बांधवांना आकाश कंदील भेटवस्तू देऊन त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्यात आला.आणि खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी केली.तसेच या मेळाव्यामध्ये सदानंद पावले यांनी रोजगाराची संधी उपलब्ध करण्यासाठी स्वतः दिवाळीनिमित्त स्टॉल लाऊन रोजगाराची संधी उपलब्ध केली.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे दिव्यांग बांधवांसाठी आयोजित करण्यात आलेली गायन स्पर्धा. या स्पर्धेत दिव्यांग बांधवांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत आपल्या गायनकलेचे सुंदर सादरीकरण केले. स्पर्धेतील उत्कृष्ट सादरीकरणाच्या आधारे विजेत्यांची निवड करून त्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून सुनील कांबळे,बाबुराव गावडे यांनी काम पाहिले.या स्पर्धेमुळे कार्यक्रमात आनंद, उत्साह आणि चैतन्याचे वातावरण निर्माण झाले.
दिव्यांग व्यक्तींना केवळ सहानुभूती नव्हे, तर सन्मान, समान संधी आणि आत्मविश्वासाने जगण्याचे बळ मिळावे, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण ठरला. दिव्यांग बांधवांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि समाधानाने संपूर्ण कार्यक्रमाला एक वेगळीच उंची प्राप्त झाली.या कार्यक्रमध्ये 200 हून जास्त दिव्यांग बांधव सहभागी झाले होते.साईकृपा संस्थेच्या वतीने सर्व दिव्यांग बांधवांना अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली.
दिव्यांग बांधवांच्या कल्याणासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या सिंधुदुर्ग साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था कसाल,महात्मा गांधी सेवा संघ संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र सिंधुदुर्ग व लायन्स क्लब कुडाळ यांच्या संयुक्त प्रयत्नातून आयोजित हा उपक्रम दिवाळीच्या आनंदासोबतच माणुसकी, आपुलकी आणि सामाजिक एकतेचा सुंदर संदेश देणारा ठरला.
