जिल्हा परिषद सिंधुदुर्गची 4 नोव्हेंबर रोजी जिल्हास्तरीय पेन्शन अदालत
सिंधुदुर्ग
जिल्हा परिषद सिंधुदुर्गची जिल्हास्तरीय पेन्शन अदालत बुधवार, दिनांक 4 नोव्हेंबर 2026 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा परिषद सिंधुदुर्ग येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, सिंधुदुर्गनगरी येथे आयोजित करण्यात आली असल्याची माहिती उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा. प्र.) जयप्रकाश परब यांनी प्रसिध्दीपत्रकद्वारे दिली आहे.
