You are currently viewing पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेसाठी 13 नोव्हेंबरपर्यंत ऑफलाईन अर्ज करण्याची मुदत

पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेसाठी 13 नोव्हेंबरपर्यंत ऑफलाईन अर्ज करण्याची मुदत

पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेसाठी 13 नोव्हेंबरपर्यंत ऑफलाईन अर्ज करण्याची मुदत

सिंधुदुर्ग

सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील धनगर समाजाच्या उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना’ राबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

            या योजनेंतर्गत विमुक्त जाती व भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील (NT-C) बारावीनंतर पदवी, पदव्युत्तर तसेच व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या विद्यमान (Existing) विद्यार्थ्यांना सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी लाभ घेण्याकरिता ऑनलाईन पोर्टल सुरळीत होईपर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुसार अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 13 नोव्हेंबर 2026 पर्यंत निश्चित करण्यात आली आहे.

इच्छुक पात्र विद्यार्थ्यांनी आपले अर्ज ऑफलाईन पद्धतीने सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, सिंधुदुर्ग कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सिंधुदुर्गनगरी, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग येथे मुदतीत जमा करावेत.

जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी विहित मुदतीत अर्ज सादर करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याणचे सहायक संचालक उदयसिंह गायकवाड यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा