You are currently viewing विठोबा विठोबा

विठोबा विठोबा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी चंद्रशेखर कासार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*विठोबा विठोबा* 

 

विठोबा विठोबा

कटीवर हात

विटेवर उभा

पंढरपूरात

 

मंदिरात तुला

रोज मी पाहतो

म्हणे भक्ता घरी

रोज तू राहतो

 

वारकरी पंथ

लीन चरणात

मार्ग हा भक्तीचा

तुझ्या दर्शनात

 

जेथे जातो तेथे

तुला मी पाहतो

विठ्ठल विठ्ठल

माणूस वदतो

 

विटेवर उभा

मुर्तीत दिसतो

मना मना मधे

रूप मी पाहतो

 

विठू तू सावळा

आहे साधा भोळा

पाहता लोचनी

लागे तुझा लळा

 

कवी :-

*चंद्रशेखर प्रभाकर कासार*

*चांदवडकर, धुळे.*

७५८८३१८५४३.

प्रतिक्रिया व्यक्त करा