*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*किती सोसतेस काव्य कळा*
वाजवून घंटा नारो शंकराची
ठेवतेस मस्तक पायऱ्यांवर
मिळता सुंदर *आशीर्वाद*
हजर होतेस *कट्ट्यावर*
//1//
ऐकवून कविता गूढ अशी
देतेस मेंदुला भरपूर ताप
चक्रे फिरतात *डोक्यामधे*
*नसते करतेस उपद्व्याप*
//2//
मुखडा हसरा पाहून तुझा
सुचतात कविता *भन्नाट*
सादर करतो *एकसे एक*
मंत्रमुग्ध होतो सरीता तट
//3//
ध्येय एकदा पक्के असता
कां करावी काळजी आपण
उंडारू द्यावी मुक्त *प्रतिभा*
जनता करते सुंदर निरूपण
//4//
अनुभव नाही *तुझा वेगळा*
घालतेस काव्य जेव्हा जन्माला
पाहून तुजला *भर दुपारी*
*किती सोसतेस काव्य कळा*
//5//
विनायक जोशी 🖋️ठाणे
0211/9324324157
