You are currently viewing आयुर्वेद आणि योग हाच निरोगी जीवनाचा मार्ग – डॉ. प्रशांत ससाणे

आयुर्वेद आणि योग हाच निरोगी जीवनाचा मार्ग – डॉ. प्रशांत ससाणे

आयुर्वेद आणि योग हाच निरोगी जीवनाचा मार्ग – डॉ. प्रशांत ससाणे

हुमरमळा येथे मोफत आरोग्य तपासणी व चिकित्सा शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; २५० रुग्णांनी घेतला लाभ

कुडाळ :

आजच्या धकाधकीच्या जीवनात आरोग्य सुस्थितीत ठेवायचे असेल, तर आयुर्वेद आणि योग हाच उत्तम पर्याय आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान, गोवा येथील डॉ. प्रशांत ससाणे यांनी केले. हुमरमळा (वालावल) येथे आयोजित मोफत आरोग्य तपासणी व चिकित्सा शिबिरात ते बोलत होते. या शिबिराला पंचक्रोशीतील २५० रुग्णांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत लाभ घेतला.
अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान, धारगळ (गोवा) आणि ग्रामपंचायत हुमरमळा (वालावल) यांच्या संयुक्त विद्यमाने धवल सांस्कृतिक सभागृह येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन डॉ. प्रशांत ससाणे यांच्या हस्ते पंचायत समिती सदस्या अर्चना बंगे आणि सरपंच अमृत देसाई यांच्या उपस्थितीत झाले.
यावेळी बोलताना डॉ. ससाणे म्हणाले की, जीवनात आनंदी आणि निरोगी राहण्यासाठी योगाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. भारतीय संस्कृतीत योगाला विशेष स्थान असून, सुसंस्कारित पिढी घडविण्याबरोबरच माणसाला निरोगी ठेवण्याचे सामर्थ्य योगामध्ये आहे. आयुर्वेदातही योगाला महत्त्वाचे स्थान आहे. धारगळ येथील आयुष रुग्णालयाचा पंचक्रोशीतील अनेक रुग्णांना लाभ होत आहे. या रुग्णालयाच्या माध्यमातून हुमरमळा येथे शिबिर आयोजित करावे, अशी स्थानिकांची मागणी होती. लोकसेवेच्या भावनेतून आज हे शिबिर आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
या शिबिरात २५० रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी व चिकित्सा करण्यात आली. तसेच प्रत्येक रुग्णाला मोफत औषधांचे वाटप करण्यात आले. शिबिराला रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य अतुल बंगे, उपसरपंच रश्मी वालावलकर, ग्रामअधिकारी अपर्णा पाटील, डॉ. रघुवीर हडीमनी, डॉ. भार्गवी भिडे, डॉ. लतिशा कुमरपन, डॉ. पुरीन, रिया गवस, पूजा कुबल, तेजस राणे, विनित गवस, सेजल नाईक, मधुरा शिरसाट, गायत्री भोसले, रोहित मेहरा, साक्षी कुमार, त्रुषभ पंकज, मालवी कुमारी, मनाली परब, सारथी रमाकांत भाईप, वालावल प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी जंगम, हुमरमळा उपकेंद्राच्या डॉ. श्रद्धा परब, शिंगाडे, ग्रामपंचायत सदस्य मितेश वालावलकर, संजना गुजकर आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहल सामंत यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा