दीपावली पाडव्याला मालवणात ग्रामदैवतांचा ऐतिहासिक पालखी सोहळा
१० नोव्हेंबरला दुपारी १ वाजता पालखी सोहळ्याला प्रारंभ; देवस्थान ट्रस्टचे भाविकांना आवाहन
मालवण :
मालवणचे ग्रामदैवत श्री देव नारायण आणि श्री देव रामेश्वर यांचा ऐतिहासिक पालखी सोहळा दीपावली पाडवा अर्थात बलिप्रतिपदेच्या मुहूर्तावर मंगळवार, १० नोव्हेंबर २०२६ रोजी पार पडणार आहे. दुपारी १ वाजता या पालखी सोहळ्याला प्रारंभ होणार आहे.
या ऐतिहासिक आणि पारंपरिक पालखी सोहळ्याची अधिकृत घोषणा देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आली आहे. मालवणच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचा महत्त्वपूर्ण भाग असलेल्या या सोहळ्यात भाविक मोठ्या संख्येने सहभागी होतात. यंदाही भाविकांनी उत्साहाने उपस्थित राहून पालखी सोहळ्याची शोभा वाढवावी, असे आवाहन श्री देव रामेश्वर, श्री देव नारायण व श्री देवी सातेरी देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.
