पुणे / (प्रतिनिधी) :
महाकवी कालिदास प्रतिष्ठान व काव्यशिल्प पुणे यांचे संयुक्त विद्यमाने कोजागिरी निमित्त भव्य काव्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. 31 ऑक्टोबर 2026 रोजी अक्षरवेल पुणे सभागृहात सदरचे कोजागिरी निमित्त आयोजित काव्य संमेलन पुण्यातील मान्यवर कवी कवयित्रींच्या उपस्थितीत संपन्न झाले. याप्रसंगी दोन्ही संस्थांचे पदाधिकारी सर्वश्री उपाध्यक्ष डॉ. ठाकुरदास, ॲड.संध्या गोळे, काव्यशिल्पचे अध्यक्ष सौ. राजश्री सोले, मकरंद घाणेकर, ऋचा कर्वे तसेच महाकवी कालिदासचे कार्याध्यक्ष मा. काकासो चव्हाण, मिलिंद जोशी, बंडा जोशी, सुधीर कुबेर, डॉ.मधुसूदन घाणेकर, बाबा ठाकूर, यशवंत देव, अशोक भांबुरे, सुरेश शेठ, प्रा. लक्ष्मण शिवणेकर असे मान्यवर सभासद कवी कवयित्री आवर्जून उपस्थित होते ही लक्षणीय बाब होती. सर्वांनी समारंभाचे औचित्य साधून आपापल्ल्या प्रासादिक रचना सादर केल्या. कवयित्री ऋचा कर्वे यांनी कार्यक्रमाचे बहारदार सूत्र संचालन केले. मकरंद घाणेकर यांच्या आभार प्रदर्शनानंतर दुग्धपानाने या कोजागिरी कार्यक्रमाची सांगता सांगता झाली.
