You are currently viewing महामार्गाच्या कामामुळे शेतीचे नुकसान; अजित नाडकर्णी आक्रमक!

महामार्गाच्या कामामुळे शेतीचे नुकसान; अजित नाडकर्णी आक्रमक!

महामार्गाच्या कामामुळे शेतीचे नुकसान; अजित नाडकर्णी आक्रमक!

शेतातील पाण्याचा निचरा होत नसल्याने संताप; महिनाभरात तोडगा न निघाल्यास प्लॉटसमोर रास्ता रोको आंदोलनाचा इशारा

कणकवली :

मुंबई-गोवा महामार्गाच्या कामादरम्यान आवश्यक निकषांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत शेतजमिनीचे नुकसान होत असल्याबद्दल अजित नाडकर्णी यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. महामार्गाच्या कामासाठी करण्यात आलेल्या निकृष्ट पाईप टाकण्याच्या कामामुळे आपल्या एक एकर शेतीचे नुकसान होत असून, संबंधित पाईप तातडीने काढून योग्य तोडगा काढावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
आपल्या शेतात गेल्या १५ दिवसांपासून पाऊस नसतानाही सुमारे चार फूट पाणी साचून राहिले आहे. कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे पाण्याचा निचरा होत नसल्याने शेतीचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोप नाडकर्णी यांनी केला आहे. महामार्गाच्या कामासाठी कंत्राटदाराचे नुकसान होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी स्वतःच्या जमिनीचे नुकसान का सहन करायचे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
संबंधित पाईप तातडीने काढून घ्यावेत किंवा याबाबत तोडगा काढण्यासाठी कंत्राटदाराने प्रत्यक्ष भेटावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. अन्यथा आपल्या शेतालगतचे पाईप स्वतः काढून टाकण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. यासंदर्भात मंत्री नितेश राणे आणि आमदार नीलेश राणे यांना निवेदनाच्या प्रती पाठविण्यात आल्या आहेत.
येत्या महिनाभरात या प्रश्नावर ठोस तोडगा न निघाल्यास आपल्या प्लॉटसमोर रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा अजित नाडकर्णी यांनी दिला आहे. महामार्गाच्या कामामुळे शेतकऱ्यांच्या जमिनीचे नुकसान होऊ नये आणि शेतीतील पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य व्यवस्था करण्यात यावी, अशी त्यांची मागणी आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा