*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी चंद्रशेखर कासार लिखित अप्रतिम लावणी*
*इश्काचं फटूकं*
आला दिवाळी सण तुम्ही घर ला या ना
अहो राया इश्काचं फटूकं फोडा ना ||धृ||
दिवाळीची चाहूल आली या दारात
प्रेमाचं पाऊल आज पडावं घरात
नका करू उशीर जरा घाई करा ना
अहो राया इश्काचं फटूकं फोडा ना ||१||
मिरवू नका तुमची मिशी सावकारी
कुठं कुठं फिरतायं कंच्या बाजारी
येताना माझ्या साठी पैठणी आना
अहो राया इश्काचं फटूकं फोडा ना ||२||
स्वागताला हार फुले सजवून आली
मिष्टान्न पान वीडा गाली गुलाबी लाली
वठावरचं गुलकंद चाखाया या ना
अहो राया इश्काचं फटूकं फोडा ना ||३||
इत्राचा सुगंध वेड लावी जीवाला
प्रेमाच्या मोहात हळूच भुंगा फसला
मखमली सेज वर गप्पा मारू या ना
अहो राया इश्काचं फटूकं फोडा ना ||४||
फटूकं भरलंय दारू गोळा ठासून
सांभाळून रहा जाम करेल फुटून
फटूकं फोडाया गुलकाडी लावा ना
अहो राया इश्काचं फटूकं फोडा ना||५||
कवी :-
*चंद्रशेखर प्रभाकर कासार*
*चांदवडकर, धुळे.*
७५८८३१८५४३.
