विश्वनाथ म्हापणकर यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वेंगुर्ले युवा तालुकाप्रमुखपदी निवड
पक्षाच्या कठीण काळातही निष्ठा कायम; वैभव नाईक यांच्या उपस्थितीत निवडीची घोषणा
वेंगुर्ले :
म्हापण येथील शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते विश्वनाथ राजाराम म्हापणकर यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वेंगुर्ले युवा तालुकाप्रमुखपदी निवड करण्यात आली. माजी आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांच्या उपस्थितीत त्यांच्या निवडीची घोषणा करण्यात आली.
म्हापणकर यांनी पक्षाच्या कठीण काळातही आपली निष्ठा कायम ठेवत संघटनात्मक कामात सातत्याने योगदान दिले आहे. ग्रामीण भागात जनसंपर्क वाढविणे आणि युवकांना पक्षाशी जोडण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. त्यांच्या निवडीमुळे म्हापण परिसरातील शिवसैनिक आणि युवा कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
यावेळी कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, नगरसेवक मंदार शिरसाट, बाळा पावसकर, तालुकासंघटक राजन बोभाटे, जिल्हा परिषद सदस्य गंगाराम सडवेलकर आदी उपस्थित होते.
