You are currently viewing ऑन कॉल रक्तदाते संस्थेच्या पाच रक्तदात्यांनी दिली रुग्णाला नवसंजीवनी!

ऑन कॉल रक्तदाते संस्थेच्या पाच रक्तदात्यांनी दिली रुग्णाला नवसंजीवनी!

ऑन कॉल रक्तदाते संस्थेच्या पाच रक्तदात्यांनी दिली रुग्णाला नवसंजीवनी!

गोवा मेडिकल कॉलेजमध्ये बायपास शस्त्रक्रियेसाठी तातडीने केले रक्तदान; संस्थाध्यक्ष दयानंद गवस यांच्याकडून रक्तदात्यांचे कौतुक

सावंतवाडी :

गोवा मेडिकल कॉलेज, बांबोळी येथे उपचारासाठी दाखल असलेल्या सोमा गोपाळ निरवडेकर यांच्या बायपास शस्त्रक्रियेसाठी बी पॉझिटिव्ह रक्तगटाच्या पाच ते सहा रक्तदात्यांची तातडीने आवश्यकता होती. या प्रसंगी ऑन कॉल रक्तदाते संस्थेच्या पाच नियमित रक्तदात्यांनी पुढाकार घेत रक्तदान करून रुग्णाला नवसंजीवनी देण्याचे मोलाचे कार्य केले.
संस्थेचे नियमित ऑन कॉल रक्तदाते अजित निरवडेकर, संदीप जाधव, राजेश पेडणेकर, अनिकेत काजरेकर आणि गौरेश सावंत यांनी गोवा मेडिकल कॉलेज, बांबोळी येथील रक्तपेढीत जाऊन रक्तदान केले. त्यांच्या या सामाजिक कार्यामुळे गरजू रुग्णाला मदतीचा हात मिळाला. रक्तदानासारख्या जीवनदायी कार्यातून त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे.
या पाच रक्तदात्यांसोबत संस्थेचे नियमित रक्तदाते प्रशांत निरवडेकर हेही रक्तपेढीत उपस्थित होते. रक्त संकलनाच्या कामात त्यांनी मोलाची मदत केली. त्यांच्या सहकार्याबद्दल संस्थेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.
ऑन कॉल रक्तदाते संस्थेचे अध्यक्ष तथा सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक दयानंद गवस यांनी या सर्व रक्तदात्यांचे विशेष कौतुक केले. संस्थेच्या इतर नियमित रक्तदात्यांप्रमाणेच या पाच रक्तदात्यांच्या सेवाभावी कार्याचा संस्थेला सार्थ अभिमान असल्याचे त्यांनी नमूद केले.
रक्तदान हेच जीवनदान या भावनेतून गरजू रुग्णांच्या मदतीसाठी तत्पर असलेल्या या रक्तदात्यांच्या दातृत्वाला ऑन कॉल रक्तदाते संस्थेच्या वतीने मानाचा मुजरा करण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा