You are currently viewing सावंतवाडीच्या बाळकृष्ण पेडणेकरची राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत बाजी

सावंतवाडीच्या बाळकृष्ण पेडणेकरची राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत बाजी

सावंतवाडीच्या बाळकृष्ण पेडणेकरची राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत बाजी

रेटिंग कॅटेगरीत प्रथम क्रमांक; १० हजारांचे रोख पारितोषिक

सावंतवाडी

बेळगाव येथे आयोजित पहिल्या राष्ट्रीय फिडे रॅपिड रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत सावंतवाडीच्या बाळकृष्ण पेडणेकर याने रेटिंग कॅटेगरीत प्रथम क्रमांक पटकावला. ७ लाख २५ हजार रुपये पारितोषिकांच्या या स्पर्धेत देशभरातील सुमारे ३३० खेळाडूंनी सहभाग घेतला होता. बाळकृष्णला १० हजार रुपये रोख, पदक व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

नऊ फेऱ्यांमध्ये बाळकृष्णने सहा विजय आणि एक बरोबरी नोंदवत साडेसहा गुण मिळवले. त्याने आंतरराष्ट्रीय मास्टर निखिल दीक्षित याच्याविरुद्ध सामना बरोबरीत सोडवला, तर केवल निर्गुण याचा पराभव केला. या कामगिरीतून त्याने ३८ रेटिंग पॉईंट्स मिळवले.
मुक्ताई ॲकेडमीचे चिदानंद रेडकर, स्वरुप राऊळ आणि प्रज्वल नार्वेकर यांनीही स्पर्धेत चांगली कामगिरी केली. ब्लिट्झ रेटिंग स्पर्धेतही या खेळाडूंनी उल्लेखनीय गुण मिळवले. या यशाबद्दल मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष व ज्येष्ठ प्रशिक्षक कौस्तुभ पेडणेकर आणि सरचिटणीस स्नेहा पेडणेकर यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा