You are currently viewing गाव तिथे शाखा उभारण्यावर भर; प्रदीप बोरकर यांची कणकवलीत विभागप्रमुखांसोबत बैठक

गाव तिथे शाखा उभारण्यावर भर; प्रदीप बोरकर यांची कणकवलीत विभागप्रमुखांसोबत बैठक

गाव तिथे शाखा उभारण्यावर भर; प्रदीप बोरकर यांची कणकवलीत विभागप्रमुखांसोबत बैठक

संघटना वाढीसह विविध विषयांवर चर्चा; जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांचे कौतुक

कणकवली :

लोकसभा संपर्कप्रमुख श्री. प्रदीप बोरकर यांच्या उपस्थितीत कणकवली तालुक्यातील सर्व विभागप्रमुखांची बैठक संपन्न झाली. या बैठकीत संघटना वाढीसाठी प्रयत्न करणे, गाव तेथे शाखा स्थापन करणे तसेच संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासह विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी उपस्थित सर्व विभागप्रमुखांनी आपापली मते मांडत संघटनेच्या कामकाजासंदर्भातील समस्या व अडचणी लोकसभा संपर्कप्रमुख प्रदीप बोरकर यांच्यासमोर मांडल्या. संघटनेच्या विस्तारासाठी आणि गावपातळीवर संघटना अधिक मजबूत करण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील, यावरही चर्चा झाली.

नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका लढविणाऱ्या उमेदवारांचे प्रदीप बोरकर यांनी तोंडभरून कौतुक केले. निवडणुकीत उमेदवारांनी घेतलेल्या मेहनतीची त्यांनी दखल घेतली.

या बैठकीला तालुकाप्रमुख श्री. राजू राठोड यांच्यासह कणकवली तालुक्यातील सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा