*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*फुलवेडी ती प्रेमवेडी*
प्रेमवेडा तो लावून बसला
दारावरती *मधुमालती*
भाळून आली घरामध्ये
*मधुची* झाली ती मालती
//1//
स्वागत केले जंगी त्याने
देऊनी गजरा मोग-याचा
*गिफ्ट रिटर्न दिली तिने*
कानात फाया केवड्याचा
//2//
ओळखून दुष्काळ पाण्याचा
लावली त्याने मधु मालती
गळ्यात पडली कधी त्याच्या
*मालतीने केली गुंग मती*
//3//
रुसून दारी *गप्प बैसले*
*शेवंतीचे सोन ताटवे*
अबोली झाली मुकी कधीच
चाफ्याने दाखवले झेंडे हिरवे
//4//
निशाण शुभ्र दाखवून गेला
चाफा पांढरा *तिन्हीकाळ*
फिदा होऊन *आली घरात*
मालतीची पुरली भुईत नाळ
//5//
अनुरक्त ती *प्रेमी जोडी*
नाही सापडणार विश्वात
मधुमालतीची मुळे रुजली
उरली न *जागा विश्वात*
//6//
विनायक जोशी 🖋️ठाणे
2710/9324324157
