You are currently viewing अतिशयोक्ती
Oplus_16908288

अतिशयोक्ती

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*अतिशयोक्ती…*

 

जळात जळात जळात जळात

उकाडा किती हा झाला बाई

पाण्यात पाण्यात पाण्यात पाण्यात

आग ती लागली होती बाई..

 

आगीत केली मी आंघोळ आणि

वाटले शीतल किती मला

आंघोळ करता आंघोळ मी हो

शीतल लगेच झाल्या ज्वाळा…

 

सुसर ताई किती ती मोठी हो

भाजले होते की तिनेच मासे

भुजंगाचा हो करून दोर

टाकले होते तिने फासे..

 

मासे खाऊन तृप्त मी झाले नि

म्हणाली पाठीवर बस माझ्या

सुसरताई पाठ तुझी मऊ

आठवणी माझ्या झाल्या ताज्या..

 

करून सैर मिटले वैर

सुसर झाली हो मैत्रिण माझी

एक दिवस मी येईन घरी

मी ही मग झाले की राजी..

 

सुसर ताई आल्या की घरी

तुम्ही ही या मग भेटायला

चंद्राची गाडी पाठविन म्हणते

सूर्यही जाईल घ्यायला तिला..

 

प्रा. सौ. सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा