You are currently viewing बेहोश रात्र झाली…!

बेहोश रात्र झाली…!

*ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रज्ञा घोडके लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*बेहोश रात्र झाली…!*

 

बेहोश रात्र झाली,

ही आज जागराची..

मद-मत्त पौर्णिमा ही,

मधु-दुध सागराची…!

 

नि:श्वास स्पंदने ही,

होतात…चांदण्यांची..

स्पर्शाविनाच लेणी,

उठतात अंतराची…!

 

भांगात शिल्पिलेली,

ही जीग भरजरीची..

मोडून टाक रेषा,

सीमाच अंतरीची…!

 

ये..वैजयंती..माला,

कंठातल्या करांची..

पूजाच मांडिली मी,

शृंगार कुस्करांची…!

 

 

सौ.प्रज्ञा घोडके,चिंचवड,पुणे©®

प्रतिक्रिया व्यक्त करा