*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी राजा जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*आयुष्य*
आयुष्य आयुष्य म्हणजे असतं तरी काय ?
जे सरत असतं ते आयुष्य की जे उरत असतं ते आयुष्य ?
की,नेमकं आज उद्या जगू म्हणता म्हणता
जे जगायचं राहून गेलं ते आयुष्य असतं ?
आयुष्य तरी कुठे एकसारखं असतं
एका सारखं दुसऱ्याचं तरी कुठं असतं ?
खूप जवळून पाहिलं म्हणलं की आयुष्य असं जवळून पाहता येतं ?
खूप सारं भोगलय म्हणल्यावर भोग आयुष्याचा संपवता येतो ?
जवळचे दूर गेले म्हणतो तर ते असे कितीसे जवळ होते ?
दूरचे होते ते म्हणतो ? असे कितीसे ते दूर होते ?
कशाला ती खपली उचकटविणे कशाला तो सोस सारा?
खपलीच्या खाली आजही जखम ओली भार वाहे तो सारा !
अनुभव अनुभव म्हणतांना अनुभव ही अनुभवला होता सारा
तुझा माझा म्हणतांना मीच माझा हरवला कधीचाच होता सारा
डोळ्यातले अश्रू आज खारावलेच नाही सारे
आले डोळे भरून पण ते आज वाहीलेच नाही सारे
रंग बदलणारे आयुष्य आज बेरंग बेढंग झाले
कुणाशीही नको वैमनस्य म्हणे मन मनातलेच सारे
तू काय अन मी काय फुशारकी नि बाता त्या कशाला ?
जागवलेल्या त्या रात्री नि त्या आठवणी जपू मी एकटाच कशाला ?
—राजा जोशी
982368751
〰️🥀〰️🥀〰️🥀〰️
