*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*तुझ्यामुळे…*
दुधात पडले पहा चांदणे तुझ्यामुळे
चंद्राहून तू आहेस सुंदर लागले खुळे..
चंद्र पाहतो तुलाच लाजून मोहरतो
तुला आठवून तुझ्याभोवती गरगरतो
तुझ्याचसाठी टिपूर चांदणे पहा गळे..
दुधात पडले पहा…
चंद्र सुंदर कि तू सुंदर नको”तुला”
चंद्रासारखी तीट लावली तुझ्या गाला
सौंदर्याची परिसीमा तुझ्यामुळे कळे..
दुधात पडले पहा..
प्रीत अनोखी चंद्राची ग नजर खुळी
नजर न हटते जराशी ही तुजवरुन मुळी
चंद्र पाहता कशी उमलते प्रीत कळे..
दुधात पडले पहा..
प्रा. सौ. सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
