You are currently viewing शरदाचं चांदणं

शरदाचं चांदणं

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री शीला पाटील लिखित कोजागरी पौर्णिमा निमित्त अप्रतिम काव्यरचना*

 

*शरदाचं चांदणं* 

 

अश्विन महिना, शरद पौर्णिमा

स्वच्छ चांदणे, सुखद जसे

अंगणात जमली नाती गोती

चंद्र गगनी मनात हसे

 

को जागरती म्हणुनी येते

भगवती ती अंगणात

करु पुजा मनोमनी

म्हणुन जागरण करतात

 

देते ऐश्वर्य धन संपदा

जो जागरतो रात्रीला

दुग्ध शर्करा, केशरी दुध

अमृत समजुन जो प्याला

 

पाहून रूप चंद्राचे ते

दुधात घ्यावे दर्शन जे

रिद्धी सिद्धी प्राप्त होवूनी

देती वर जे पाहिजे

 

कौमुदीत घ्यावा आनंद

नयनरम्य चंद्र हासतो

कोजागिरीच्या शुभ दिनी

वर्षाव अमृताचा भासतो

 

*शीला पाटील. चांदवड.*

प्रतिक्रिया व्यक्त करा