You are currently viewing वक्तृत्व स्पर्धेत ओसरगाव मळीवाडीचा देवव्रत कदम तालुक्यात प्रथम

वक्तृत्व स्पर्धेत ओसरगाव मळीवाडीचा देवव्रत कदम तालुक्यात प्रथम

वक्तृत्व स्पर्धेत ओसरगाव मळीवाडीचा देवव्रत कदम तालुक्यात प्रथम

इयत्ता तिसरीतील चिमुकल्याचा शाल, श्रीफळ व रोख रक्कम देऊन निवासस्थानी सत्कार; मान्यवरांकडून कौतुकाची थाप

ओसरगाव :

ओसरगाव मळीवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या कु. देवव्रत सुनील कदम याने वक्तृत्व स्पर्धेत तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवून गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. त्याच्या या उल्लेखनीय यशाबद्दल निवासस्थानी जाऊन शाल, श्रीफळ व रोख रक्कम देऊन त्याचा सत्कार करण्यात आला.
यावेळी कळसुली विभागप्रमुख तथा माजी उपसरपंच चंद्रहास ऊर्फ बबली राणे, दशरथ शिंदे, प्रदीप तळेकर, राघोजी कदम, दीपक धुरी, दिगंबर चव्हाण, श्यामसुंदर गवस, श्रद्धा कदम, सानिका कदम यांच्यासह कदम परिवारातील सदस्य उपस्थित होते.
अत्यंत लहान वयात देवव्रतने वक्तृत्व कलेत मिळविलेले यश कौतुकास्पद असल्याचे उपस्थित मान्यवरांनी सांगितले. भविष्यात आपल्या प्रभावी वक्तृत्वशैलीच्या जोरावर तो मोठमोठ्या स्पर्धांमध्ये सहभागी होऊन मळीवाडी शाळेचे आणि गावाचे नाव उज्ज्वल करेल, असा विश्वास व्यक्त करत त्याला पुढील वाटचालीसाठी शुभाशीर्वाद देण्यात आले.
देवव्रतच्या या यशामुळे मळीवाडी परिसरात आनंदाचे वातावरण असून, संपूर्ण गावाच्या वतीने त्याचे पुन्हा एकदा अभिनंदन करण्यात आले. तसेच त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा