You are currently viewing बालचित्रकार प्रणित वालावलकर याने रेखाटले अंबाबाईचे सुंदर चित्र

बालचित्रकार प्रणित वालावलकर याने रेखाटले अंबाबाईचे सुंदर चित्र

बालचित्रकार प्रणित वालावलकर याने रेखाटले अंबाबाईचे सुंदर चित्र

अजित नाडकर्णी यांना चित्र भेट; लहान वयातील कलागुणांचे केले कौतुक

फोंडाघाट :

येथील प्रतिभा पेट्रोल पंपाचे मालक प्रसाद वालावलकर यांचा मुलगा प्रणित याने नवरात्रोत्सवानिमित्त श्री अंबाबाईचे सुंदर चित्र रेखाटले. हे चित्र त्याने आज अजित नाडकर्णी यांना भेट म्हणून दिले. प्रणितने यापूर्वीही अनेक सुंदर चित्रे रेखाटली असून, एवढ्या लहान वयात त्याने जोपासलेल्या चित्रकलेच्या आवडीचे अजित नाडकर्णी यांनी विशेष कौतुक केले.
प्रणित सध्या मुंबई येथे शिक्षण घेत आहे. शिक्षणासोबतच चित्रकलेची आवड जोपासत त्याने आपल्या कलागुणांची झलक दाखवून दिली आहे. त्याच्या या कलात्मक प्रतिभेचे कौतुक करत अजित नाडकर्णी यांनी त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, प्रसाद वालावलकर यांच्या मोठ्या मुलीलाही पडवे येथे एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळाला आहे. तिच्या या यशाबद्दलही अजित नाडकर्णी यांनी कौतुक करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा