You are currently viewing कणकवलीत भाजपच्या नवरात्रोत्सवाला पालकमंत्री नितेश राणे यांची भेट
Oplus_16908288

कणकवलीत भाजपच्या नवरात्रोत्सवाला पालकमंत्री नितेश राणे यांची भेट

दुर्गामातेचे दर्शन घेत केली आरती; महाराष्ट्रावरील दुष्काळाचे संकट दूर करण्यासाठी साकडे

कणकवली : भारतीय जनता पार्टी कणकवली तालुक्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नवरात्रोत्सवाला राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी दुर्गामातेचे दर्शन घेत आरती केली. तसेच महाराष्ट्रावर ओढावलेले दुष्काळाचे संकट दूर होऊन राज्यातील जनतेला दिलासा मिळावा, यासाठी दुर्गामातेच्या चरणी साकडे घातले.

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य संदेश सावंत, कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, पप्पू पुजारे, सागर राणे, दादू राणे, शहराध्यक्ष अण्णा कोदे, नगरसेवक सुप्रिया नलावडे, मनस्वी ठाणेकर, आर्या राणे, मेघा गांगण, बाबू घाडीगांवकर, बाबजी चव्हाण, राजू हिर्लेकर, प्रशांत राणे, सर्वेश दळवी, संतोष चव्हाण, राज नलावडे, महेश सावंत, अजय गांगण, प्रज्वल वर्दम, महेश मेस्त्री, स्वप्नील चिंदरकर, दिलीप तळेकर, सुभाष मालंडकर, समीर प्रभुगावकर, बंडू हर्णे, हेमंत परुळेकर, रामू विखाळे, संदीप सावंत आणि प्रकाश सावंत यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा