You are currently viewing ओसरगाव गवळवाडीत उद्या रंगणार ‘खेळ पैठणीचा’!

ओसरगाव गवळवाडीत उद्या रंगणार ‘खेळ पैठणीचा’!

ओसरगाव गवळवाडीत उद्या रंगणार ‘खेळ पैठणीचा’!

महिलांसाठी मनोरंजनाचा खास कार्यक्रम; आकर्षक बक्षिसांसह महाप्रसादाचे आयोजन

ओसरगाव :

गावातील महिलांसाठी मनोरंजनाची खास मेजवानी असलेल्या ‘खेळ पैठणीचा’ या कार्यक्रमाचे आयोजन गुरुवार, दि. १५ ऑक्टोबर २०२६ रोजी ओसरगाव येथील लिंगमाऊली मंदिरात करण्यात आले आहे.
दुपारी १ ते ३ या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून, सायंकाळी ठीक ४ वाजता ‘खेळ पैठणीचा’ या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या महिलांसाठी पहिल्या ते पाचव्या क्रमांकापर्यंत आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. तसेच गावातील सहभागी सर्व स्पर्धकांना आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहेत.

महिलांना मनोरंजनाची संधी मिळावी आणि गावातील महिलांमध्ये स्नेहभाव वाढावा, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी गावातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक ओसरगाव गवळवाडी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा