You are currently viewing वृक्ष हे सारे आपले गुरु…
Oplus_16908288

वृक्ष हे सारे आपले गुरु…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

*वृक्ष हे सारे आपले गुरु…*

पानगळ झाली झाली हो सुरु
वृक्ष हे सारे आपुले गुरू
वृक्ष वाढवू जतन करू हो .. जी जी जी..

टाकूनी जुनी सारी कात
वस्त्रे ते नवी पहा घेतात
गिरकी घेऊनी आनंदात हो.. जी जी जी..

गळण्याचे मुळी ना दु:ख
घेऊनी येती पहा सुख
वृक्षतळी जाऊन मुरतात.. हो जी जी जी..

पान फुल मुळे नि खोड
फळे देतात गोड गोड
जगावे कसे सांगतात…हो जी जी जी..

सर्वस्व अर्पूनी आम्हा
कधी ना मिरविती टेंभा
शेवटी सरणावर येतात .. हो जी जी जी..

वृक्ष हे आमुचे सांगाती
त्यांच्याविना नाही गती
सावली आजन्म देती.. हो जी जी जी…

काळ ना करील आम्हा माफ
जर का केला त्यांचा घात
नष्ट ती होईल मानवजात.. हो जी जी जी…

प्रा. सौ. सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा