You are currently viewing साहित्य प्रेरणा कट्ट्यावर साहित्यातील दुर्गा कार्यक्रम उत्साहात संपन्न

साहित्य प्रेरणा कट्ट्यावर साहित्यातील दुर्गा कार्यक्रम उत्साहात संपन्न

सावंतवाडी :

आजगाव येथील साहित्य प्रेरणा कट्ट्यातर्फे ‘साहित्यातील दुर्गा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कट्ट्याच्या या सलग मासिक बाहत्तराव्या कार्यक्रमात ११ महिला सदस्य त्यांना भावलेल्या प्रथितयश लेखिकांविषयी बोलल्या. विशेष म्हणजे नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दोन महिला सदस्यांनी उत्तमरीत्या केले. सोमवार दि. १२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता शिरोडा येथील र.ग.खटखटे ग्रंथालयात पार पडलेल्या या कार्यक्रमास मोठ्या संख्येने साहित्यप्रेमी उपस्थित होते.

आदरणीय दुर्गाबाई भागवत, इंदिरा संत, अरुणा ढेरे, सुमती क्षेत्रमाडे, शांता शेळके, बहिणाबाई चौधरी, वीणा गवाणकर, सुनिता देशपांडे, विजया मेहता, माधवी देसाई, सुधा मूर्ती या लेखिकांविषयी अनुक्रमे नम्रता राय, वैभवी रायशिरोडकर, भाग्यश्री मुद्रस, लिना परब, स्नेहा नारींगणेकर, तन्वी ओटवणेकर, अश्विनी पडवळ, प्रियदर्शनी म्हाडगुत, अर्चना लोखंडे, प्राची पालयेकर, सरोज रेडकर या महिला सदस्यांनी अभ्यासपूर्ण भाष्य केले. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिरोडा येथील र. ग. खटखटे ग्रंथालयाचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले. कार्यक्रमास उपस्थित साहित्यिक साहित्य प्रेमींचे कट्ट्याचे समन्वयक विनय सौदागर यानी आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा