You are currently viewing महिलांसाठी स्वयंरोजगाराची संधी; विविध व्यवसायांचे प्रशिक्षण

महिलांसाठी स्वयंरोजगाराची संधी; विविध व्यवसायांचे प्रशिक्षण

कल्याणी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व आश्रय प्रतिष्ठानचा उपक्रम; २१ व २२ ऑक्टोबरला कुडाळ येथे प्रशिक्षण

कुडाळ : कल्याणी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आणि आश्रय प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने रोजगारनिर्मितीअंतर्गत रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून महिलांसाठी विविध व्यवसायांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करून स्वावलंबी होता यावे, तसेच त्यांना कौशल्यविकासासह स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. प्रशिक्षणाचा कालावधी २१ ऑक्टोबर २०२६ ते २२ ऑक्टोबर २०२६ असून दैवज्ञ भवन, छत्रपती शिवाजी नगर, कुडाळ येथे होणार आहे.

या प्रशिक्षणात फॅब्रिक पेंटिंग, कार्यशाळेत विविध वस्तू तयार करणे, मेणबत्ती बनविणे तसेच महिला उद्योजकता याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. प्रशिक्षणाच्या माध्यमातून महिलांनी आपले कौशल्य विकसित करून आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे आणि स्वतःच्या पायावर उभे राहावे, यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

*फॅब्रिक पेंटिंगचे प्रशिक्षण*

फॅब्रिक पेंटिंग प्रशिक्षणामध्ये कापडावर आकर्षक रंगकाम करण्याच्या विविध पद्धती शिकविल्या जाणार आहेत. यामध्ये कापडासाठी योग्य रंगांची निवड, पारंपरिक आणि आधुनिक डिझाइन्स, स्टेन्सिल तंत्र, फुलांची व इतर आकर्षक कलाकुसर तसेच कपड्यांवर रंगकाम करताना घ्यावयाची काळजी याबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे.

*कार्यशाळेत विविध वस्तू बनविण्याची संधी*

महिलांना रेशिन ट्रे, कोस्टर, कीचेन, फोटो फ्रेम आणि आरती थाळी यांसारख्या आकर्षक वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या वस्तू तयार करून त्यांची विक्री करता यावी आणि त्यातून उत्पन्न मिळविता यावे, यासाठी आवश्यक कौशल्ये शिकविली जाणार आहेत.

*मेणबत्ती बनविण्याचे प्रशिक्षण*

मेणबत्ती बनविण्याच्या प्रशिक्षणात पिलर मेणबत्ती, स्टॅक मेणबत्ती, लाडू मेणबत्ती तसेच सुगंधी जार मेणबत्ती तयार करण्याचे तंत्र शिकविले जाणार आहे. याशिवाय फॅन्सी दिवे व सजावटीच्या वस्तू तयार करण्याबाबतही मार्गदर्शन केले जाणार आहे. सण-उत्सव आणि विविध प्रसंगांसाठी आकर्षक उत्पादने तयार करून त्यांची विक्री करण्याची संधी महिलांना मिळू शकते.

*पॅकेजिंग व बॉक्स मेकिंगचे प्रशिक्षण*

महिलांना गिफ्ट बॉक्स, पिलो बॉक्स, स्लाइडिंग बॉक्स, पेपर बॉक्स, ज्वेलरी बॉक्स, ड्रॉवर बॉक्स आणि विडो बॉक्स, षटकोनी बॉक्स तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. विविध उत्पादनांसाठी आकर्षक पॅकेजिंग तयार करणे आणि त्यातून व्यवसायाची संधी निर्माण करणे, यावर भर दिला जाणार आहे.

*महिला उद्योजकता प्रशिक्षण*

महिलांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करताना उत्पादनांची योग्य किंमत कशी ठरवावी, ग्राहकांपर्यंत उत्पादने कशी पोहोचवावीत, व्हॉट्सॲप व इन्स्टाग्रामच्या माध्यमातून मार्केटिंग कसे करावे, तसेच उत्पादनांची आकर्षक मांडणी कशी करावी, याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. घरातून लघुउद्योग सुरू करून आर्थिक उत्पन्न मिळविण्यासाठी हे प्रशिक्षण उपयुक्त ठरणार आहे.

*प्रशिक्षण शुल्क व प्रमाणपत्र*

कागदी पिशव्या व एन्व्हलप तयार करण्याच्या प्रशिक्षणासाठी ५०० रुपये, रेझीन कला प्रशिक्षणासाठी ५०० रुपये, फॅब्रिक पेंटिंग प्रशिक्षणासाठी ५०० रुपये, पॅकेजिंग बॉक्स मेकिंगसाठी ५०० रुपये आणि कॅण्डल मेकिंगसाठी ५०० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. याशिवाय प्रत्येक प्रशिक्षणासाठी ५०० रुपये फॉर्म फी आहे.

प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र देण्यात येणार असून, प्रत्येक प्रशिक्षणाचा कालावधी चार तासांचा असल्याचे जाहिरातीत नमूद करण्यात आले आहे.

या उपक्रमाला सौ. नंदिनी रामचंदानी या स्वतः उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. अधिक माहितीसाठी सौ.स्वाती उमेश पेडणेकर – 9930278462, सौ. उन्मेषा उमेश दाभोलकर – 7057640532, सौ. सानिका जितेंद्र सावंत – 9322649752 यावर संपर्क साधावा.

महिलांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन विविध व्यवसायांचे कौशल्य आत्मसात करावे, स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा