*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी गीतकार गायक संगीतकार श्री अरुणजी गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*
*”श्री तुळजाभवानी माता”*
तुळजा माता महाराष्ट्र कुलस्वामिनी वंदन
क्षात्रतेज आदिशक्ति करिते कल्याण रक्षणIIधृII
मंदिर आहे राष्ट्रकूट यादवकालीन प्राचीन
छत्रपती शिवाजी राजे होती चरणी लीन
स्वराज्य रक्षिण्या राजांना दिली तलवार देवीनंII1II
अष्टभुजा काळया पाषाणाची मूर्ती आहे प्रसन्न
स्वयंभू मूर्ती महिषासुर मर्दिनी सिंहासनस्थ
केश संभार शिरी मुगुट शोभे विलसूनII2II
हाती त्रिशूल बिचवा बाण शंखचक्र पानपात्र
राक्षस शेंडी पाठीवर बाणांचा भाता रक्षणार्थ
उजव्या अंगी चंद्र डाव्या अंगी शोभे सूर्य लावण्यII3II
कल्लोळ तीर्थासह देवी स्नानासाठी तीर्थ तीन
मुख्य द्वाराशी आहे सिद्धिविनायक गजानन
आदिशक्ती आदिमाया अन्नपूर्णा मंदिर साक्षीनंII4II
मातंगी माता मंदिर यमाई देवी चे स्थान
जेजुरी खंडोबा मंदिर लक्ष घेती वेधून
साडेतीन पिठा पैकी पूर्ण शक्ती पीठ प्रसिद्ध II5II
हेमाडपंथी मंदिरास आहेत प्रवेशद्वार दोन
शहाजीराजे एक दुसरे राजमाता जिजाऊ नावानं
पायऱ्या उतरल्यावर आहे गोमुख तीर्थII6II
असंख्य भाविक येती दर्शनार्थ विश्वांतून
भगवतीचे रूप पाहून मन येई भरून
पुजारी करिती सुंदर पूजा वाटते प्रसन्नII7II
मातेची चल मूर्तीचे पालखी सोहळा अनन्य
दसरा रंगपंचमी काळभैरव भेंडोळी सण
दिवाळी नवरात्रांत हळदीकुंकू चाले उधळणII8II
छबिना मेघडंबरी पालखी सोहळा अनन्य
मंगळवार गुढीपाडवा पौर्णिमा सण होई संपन्न
भवानी माता जागृत देवस्थान करूया वंदनII9II
©️काव्य:श्री अरुण गांगल. कर्जत रायगड महाराष्ट्र.
पिन.410201.Cell.9373811677.
