You are currently viewing अनमोल

अनमोल

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*अनमोल….*

 

या देण्याचे भान असावे सदैव मनुजा तुला

या सृष्टीची होऊ न शकते “तुला” कधी ही मुला…

 

किती ऋतु हे येऊन जाती पेरून जाती मोती

नक्षत्रे नि जरी चांदण्या आल्या न आपुल्या हाती

सृष्टीचे हे देणे अवघड पुरून उरते सारे

जरा न थांबती सतत वाहती सुगंधित हे वारे..

 

या देण्याचे भान असावे सदैव मनुजा तुला

या सृष्टीची होऊ न शकते “तुला” कधी ही मुला…

 

नदी वाहते निर्झर वाहे खळाळते हे पाणी

काटे डोंगर दऱ्या तुडवूनी सदैव गाती गाणी

मळ ही सारा वाहून नेती सुपिक करूनी शेती

काठाने ते मळे बहरती वृक्ष झुलविती झुला..

 

सदैव झळके नील ते अंबर गहन किती ते खोल

सागर उधळे माणिक मोती किती धन अनमोल

पवन वाहतो झुळझुळ झुळझुळ श्वास त्यावरी चाले

माती आपुली आहे माता धान उगवते, भाले

 

नसे बघ व्यवहार तिथे रे व्यापार असे हा खुला

नतमस्तक हो दात्यापुढती फुकट पुरवितो तुला…

 

प्रा. सौ.सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा