You are currently viewing यह दिल और उनके निगाहों के साये
Oplus_16908288

यह दिल और उनके निगाहों के साये

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री शालोमित खान यांनी केलेलं हिंदी गीताचे रसग्रहण*

 

चित्रपट: प्रेम पर्बत

गीत के बोल; यह दिल और उनके निगाहों के साये।

गायिका: लता मंगेशकर

गीतकार: जानीसार अख्तर

संगीतकार: जय देव

 

मला वाटते आपल्यापैकी बऱ्याच जणांनी हे सुंदर, सुमधुर व अर्थपूर्ण गाणे ऐकले असेल. परंतु हे गाणे कोणत्या चित्रपटात आहे हे बहुतेक जणांना माहीत नसेल म्हणून त्याची माहिती मी वरती दिलेली आहे. हे गाणे अतिशय सुंदर आणि मधुर आहे संपूर्णतः प्रेम भावनेवर आधारलेले हे गाणे ऐकताना मन अत्यंत प्रसन्न आनंदित आणि प्रेम भावनेत मग्न होऊन जाते. तरीदेखील या गाण्याचे चित्रीकरण व चित्रपटाचे नाव बऱ्याच जणांना माहीत नसेल कारण 1973 मध्ये पूर्ण झालेला हा चित्रपट कधीही पडद्यावर आला नाही. या गाण्याचे चित्रीकरणही पाहायला मिळाले नाही. या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत रेहाना सुलतान, सतीश कौल हे दोघेजण होते त्यांच्याबरोबर नाना पळशीकर आणि आगा हेही सहकलाकार होते. तसेच हेमामालिनी हिचा या चित्रपटामध्ये अतिथी कलाकार म्हणून सहभाग होता.

सर्वप्रथम ते संपूर्ण गाणे मी आपल्यासमोर आपल्या माहिती करता लिहित आहे त्यानंतर त्या गाण्याचा अर्थ आणि त्या मागील भाव या दोन्हीवरही मी आपल्याशी चर्चा करेल.

 

ये दिल और उनकी निगाहों के साए

मुझे घेर लेते हैं बड़ों के साए।

पहाड़ों को चंचल किरण चूमती है

हवा हर नदी का बादल चूमती है

यहां से वहां तक, है चाहों के साए

यह दिल और उनकी निगाहों के साए:

 

१:लिपटते हैं पेड़ों से बादल घनेरे

यह पल-पल उजाले, यह पल-पल अंधेरे

बहुत ठंडी ठंडी, है राहोंके साये

यह दिल और उनकी निगाहों के साए:

 

२:धड़कते हैं दिल कितनी आजादियों से

बहुत मिलते जुलते है इन वादियों से

मोहब्बत की रंगीन पनाहों के साये

यह दिल और उनकी निगाहों के साए

मुझे घेर लेते हैं बाहोंके साये।

आत्ताच आपण हे गाणे संपूर्ण रित्या पाहिले आहे वाचले आहे आता त्याचा अर्थ आणि त्यातील भाव आपण बघणार आहोत. मी सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे हे गाणे एक प्रेम गीत आहे या गाण्यांमध्ये केवळ आणि केवळ प्रेमाचे वर्णन आपल्याला दिसून येईल. या गाण्याची पार्श्वभूमी अशी आहे की प्रेमिका निसर्गातील एका अशा ठिकाणी एकटीच आली आहे जेथे नदी वाहत आहे डोंगर दर्या दिसत आहेत उंच उंच झाडे आहेत आणि सगळीकडे निसर्गाचे सौंदर्य प्रतीत होत आहे. त्या सर्वांमध्ये तिला आपल्या मनाचे प्रतिबिंब दिसून येते कारण ती स्वतः कोणाच्यातरी प्रेमामध्ये मग्न आहे जरी तिचा प्रियकर तिच्याबरोबर नाही तरी देखील त्याचे अस्तित्व तिला सारखे जाणवत राहते तिथल्या प्रत्येक वस्तूमध्ये त्यांच्या हावभावांमध्ये तिला प्रेम भावने व्यतिरिक्त काही दिसत नाही म्हणूनच ती प्रेमिका आपले प्रेम तिथे व्यक्त करीत आहे

ती म्हणते माझं हे हृदय ज्याच्यावर माझ्या प्रेमीच्या डोळ्यांची सावली पडलेली आहे. केवळ एवढाच त्याचा अर्थ नाही आहे कारण तिच्या हृदयामध्ये जे प्रेमाची आग लागलेली आहे त्यामुळे तिचे हृदय तळमळत आहे पण तिला असे वाटते की माझ्या प्रेमीचे डोळे मला पाहत आहेत त्याच्या डोळ्यांची सावली माझ्या हृदयावर पडलेली आहे त्यामुळेच हृदयात लागलेली प्रेमाची आग शितल होत आहे. तिला अशी ही जाणीव होते की तिच्या बाजूलाच तिचा प्रेमी उभा आहे आणि त्याने तिला आपल्या मिठीत घेतले आहे तिला आलिंगन दिलेले आहे त्याचा स्पर्श त्यातील आनंद ती अनुभव करीत आहे म्हणूनच ती म्हणते की माझ्या शरीराला त्याच्या हातांनी वेढा घातला आहे.

या गाण्याच्या पहिल्या कडव्यात ती म्हणते आहे येथे डोंगर आहे त्यांना सूर्याची किरणे चुंबीत आहेत अर्थात पर्वतांवर सूर्याची किरणे पडलेली आहेत पण या प्रेमवेडीला असेच वाटते किती त्या पर्वतांचे चुंबन घेत आहेत. पुढे ती म्हणते की इथून वाहणारी हवा किंवा वाहणारा वारा प्रत्येक नदीच्या शरीराचे चुंबन घेत आहे कारण ज्याच्या मनात प्रेम भावना आहे त्याला सर्व जग प्रेम करताना दिसून येते येथे या प्रेमीकाला देखील असेच वाटते की जो वारा नदीच्या पाण्यावरून वाहत आहे त्यामुळे पाणी थोडेसे थरथरते हलते जणू प्रेमिका प्रियकराच्या चुंबनामुळे लाजून थरथरते आपले अंग चोरून घेते तीच भावना येथे प्रेमीकेच्या मनात आहे तिला वाटते की हा वारा देखील नदीच्या जलाचे चुंबन घेत आहे. म्हणूनच ती म्हणते की येथून तेथपर्यंत जिकडे पहावे तिकडे हे प्रेम आणि प्रेमच दिसून येते कुठेही पहा चाह अर्थात प्रेम भावनेची सावली दिसून येत आहे प्रेम भावना चाहत दिसून येत आहे.

तिसऱ्या कडव्या मध्ये ती सांगते आहे की येथे हृदय किती स्वतंत्रपणे धडकत आहे येथे कोणाची भीती नाही कोणाची अडचण नाही कोणी उपदेश करायला नाही कोणी आडवं येत नाही त्यामुळे हृदय प्रेमाच्या भावनेने अगदी स्वतंत्रपणे धडकत आहे त्याच्यावर कशाचेही बंधन नाही. येथील जे वातावरण आहे ज्या दऱ्या खोऱ्या आहेत त्यांच्याशी माझे हृदय मिळून मिसळून गेले आहे त्यांच्याप्रमाणेच मुक्त झाले आहे स्वतंत्र झाले आहे इथे कोणाची भीती नाही असे कोणी अडवणारे नाहीत त्यामुळे माझे हृदय अगदी मुक्तपणे त्याच्या आठवणीने त्याच्या प्रेमाने त्याच्या जवळच्या भावनेने धडकत आहे त्यावर कोणाचे बंधन नाही खरोखर ही जागा म्हणजे प्रेमी लोकांसाठी एक आश्रयस्थान आहे येथे येऊन प्रेमी मुक्तपणे आपली प्रेम भावना व्यक्त करू शकतात त्यांना येथे पनाह अर्थात आश्रय मिळतो कोणी अडवत नाही त्यांच्या आश्रयाचे छत्र आपल्या वर असते त्या आश्रयाच्या सावलीत आपण मुक्तपणे प्रेमभावना व्यक्त करू शकतो.

खरोखर माझ्या या प्रेम भावनेने तप्त हृदयावर माझ्या प्रेमीजनाच्या नजरेची सावली पडलेली आहे ज्यामुळे माझे तप्त हृदय शितल झाले आहे आणि मला असे वाटते की तो माझ्या जवळच आहे त्याच्या हातांचा विळखा माझ्या अंगाभोवती पडलेला आहे.

 

सर्व रसिकांना माझी विनंती आहे की त्यांनी हे गाणे जरूर जरूर ऐकावे अतिशय सुंदर आणि सुमधुर असे हे गाणे आहे त्यातला भाव आणि अर्थ तर आता आपल्याला समजलेलाच आहे त्यामुळे ते गाणे जास्त आवडेल याची मला खात्री आहे कृपा करून मी या गाण्याचे केलेले रसग्रहण आपल्याला कसे वाटले याचा अभिप्राय नक्की नक्की द्यावा अशी मी अपेक्षा करते.

आपली सर्वांची सखी

 

शालोमित खान

इंदापूर

+91 9850022414

प्रतिक्रिया व्यक्त करा