You are currently viewing विट्यातील श्री चौंडेश्वरी मंदिरात नवरात्रोत्सव उत्साहात साजरा करण्याची तयारी पूर्ण 

विट्यातील श्री चौंडेश्वरी मंदिरात नवरात्रोत्सव उत्साहात साजरा करण्याची तयारी पूर्ण 

विटे / प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार :

विटा शहर व परीसरातील तमाम अबालवृद्धांचे श्रद्धास्थान म्हणुन मान्यता पावलेल्या श्री चौंडेश्वरी देवीचा नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहात व मंगलमय वातावरणात साजरा करण्याचे नियोजन मंदिर व्यवस्थापणाने केले आहे.श्री चौंडेश्वरी मंदिरातील या नवरीत्रोत्सवास तब्बल ५५ वर्षांची परंपरा असुन याकामी चालु वर्षी च्या उत्सवासाठी श्री चौंडेश्वरी मंदिराचा कोपना न कोपरा स्वच्छ करण्यात आला असुन सालाबाबदप्रमाणे आकर्षक विद्युत रोषणाई करण्याचे व मंदिर सजवीण्याचे काम पुर्ण झाले आहे.रवीवार ११ आक्टोबर २०२६ रोजी मंदिरामध्ये विधीवत घटस्थापणा करुन शारदीय नवरात्रमहोत्सवाचा प्रारंभ केला जाणार आहे.नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दररोज प्रातःकाळी अगदी पहाटे श्री देवीस अभ्यंग स्नान,अभिषेक करण्यात येतो व नऊ दिवस नऊ वेगवेगळ्या रंगात व स्वरुपात देवीची अत्यंत आकर्षक व मनमोहक पुजा बांधली जाते.या दररोज बांधल्या जाणाऱ्या देवीच्या विविध रुपांतील पुजेचे विटेकरांना व विशेषतःमहिला वर्गास खुप आकर्षण असते.दर्शनासाठी दिवसभर भाविकांच्या रांगा लागलेल्या असतात.

सकाळच्या सत्रात दररोजच्या दुर्गामाता दौंडचा समारोप श्री चौंडेश्वरी मंदिरात महाआरतीने केला जातो.यास शहरातील शेकडोभावीक उपस्थित असतात त्यानंतर दिवसभर विविध धार्मिक विधी संपन्न होतात व सायंकाळी ठिक ०७ वाजता मंदिरात खुप मोठ्या मंगलमय वातावरणात देवीची महाआरती संपन्न होते.या आरतीसाठी शहरातील हजारो महिला आपापल्या घरातुन पंचारतीचे तबक हातात घेऊन मंदिरात येत असतात हजारो महिलांच्या हातात असलेल्या निरंजनाच्या मंद दिव्याच्या प्रकाशात होत असलेली महाआरती मंदिरामध्ये भक्तिमय मंगल वातावरणाचा उच्च बिंदु साधत मंदिर व शहरात सकारात्मक उर्जा तयार करीत असते.नवरात्रोत्सवात भाविक व महिलांची प्रचंड गर्दी विचारीत घेऊन विटा पोलिस मंदिर व परीसरात चोख बंदेबस्त ठेऊन सहकार्य करीत असतात.विजयादशमी दिवशी घट उठवीणेचा मंगल विधी संपन्न करुन व आपट्याच्या पानांचे अर्थात सोन्याचे पुजन करुन नवरात्र उत्सवाची सांगता केली जाते.

ही माहिती श्री. देवांग समाज ट्रस्ट चे अध्यक्ष दत्ताभाऊ चोथे यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा