You are currently viewing निघून गेला दूर जरी तो

निघून गेला दूर जरी तो

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*निघून गेला दूर जरी तो*

 

निघून गेला दूर जरी तो

ठेवून गेलाय रांगडेपण

नाम ठेवून दान करायला

संस्था केली त्याने स्थापन

//1//

ओझे आहे जबाबदारीचे

पाणी पाजायचे *वृक्षांना*

ठेवायचे त्यांना सदाहरित

नाही द्यायच्या टाकून माना

//2//

अभिनय नाही करायचा कोठे

पुसायचे अश्रू *गरजूंचे*

नाही कराची जाहिरात

आपले काम निमूट

करायचे

//3//

आठवण येता अश्रू पुसायचे

मिटल्या तोंडी कराचे काम

वाहून घ्यायचं नामला आता

मोठ करायचं त्याचं नाम

//4//

पदर खोचून *कमरेला*

काम करायचं आपण आधी

वाहू अनोखी श्रद्धांजली

आठवणीची विसरू व्याधी

//5//

 

विनायक जोशी🖋️ ठाणे

0910/9324324157

प्रतिक्रिया व्यक्त करा